लग्नाला नकार दिल्याने “त्याने” तिच्या शरीराचे पाच तुकडे करून फेकले , शेवटी पोलिसांनी त्याला शोधून केले गजाआड

लग्नासाठी प्रस्ताव नाकारल्याचा राग आल्याने संतप्त विवाहित प्रियकराने एका सेक्स वर्करची निर्घृण हत्या केल्याची घटना दिल्लीत घडल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून एका ३७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सेक्स वर्करची निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि , आरोपी व्यक्ती हा विवाहित होता. २००८ मध्ये रेश्मा नावाच्या मुलीशी त्याचं लग्न झालं होतं. त्याला तीन मुलेही आहेत . परंतु एका सेक्स वर्करसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. आरोपीची ओळख अयूब उर्फ विक्की अशी असून तो ३२ वर्षांचा आहे. दिल्लीत तो स्ट्रीट कपड्यांच्या विक्रेता म्हणून काम करतो. सुमारे चार वर्षांपूर्वी २०१५ मध्ये, तो जीबी रोडवरील सेक्स वर्करच्या संपर्कात आला. हळूहळू अयूब आणि सेक्स वर्कर यांच्यात प्रेम कहानी सुरू झाली.
दरम्यान आरोपीला सेक्स वर्करशी लग्न करायचं होतं. लग्नासाठी तो तिच्यावर प्रचंड दबाव आणत होता. परंतु सेक्स वर्करला आरोपीचं लग्न झालं असल्याची माहित होतं. म्हणून तिने अयूबशी लग्न करण्यास नकार दिला. याचा त्याला राग आला आणि त्यात अयूबने तिची हत्या केली. २० ऑगस्ट रोजी त्याने आपल्या मित्राची स्कूटी घेतली आणि तो तिला भेटण्यासाठी गेला. जाताना त्याने सोबत मोठा चाकूही होता. अयूबने लताला बोलावून तिला तलावाकडे नेले आणि रागात असलेल्या अयूबने लताची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे ५ तुकडे केले. आणि शहरात वेगवेगळ्या भागांत फेकले.