Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मंगळसूत्र चो-या रोखण्यासाठी पोलिसांची नाकाबंदी, स्पोर्टस बाईकस्वार पोलिसांच्या रडारवर

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : वाढत्या मंगळसूत्र चो-या रोखण्यासाठी पोलिसांनी सकाळी ६ ते दुपारी १२  या वेळेत शहराच्या विविध भागात नाकाबंदी करण्यास सुरूवात केली आहे. धुमस्टाईल वेगाने स्पोर्टस बाईक चालविणारे पोलिसांच्या रडारवर असून नाकाबंदीदरम्यान पोलिस स्पोर्टस बाईकस्वारांची कसून चौकशी करीत असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी सोमवारी (दि.२६) दिली.
गेल्या महिनाभरापासून मंगळसूत्र चोरट्यांनी शहर परिसरात धुमाकुळ घातला असून विविध भागातून चोरट्यांनी ८ जणींचे सौभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्र लंपास केले आहेत. मंगळसूत्र चोरी करण्यासाठी चोरटे विशेष करून सकाळची वेळ निवडत असल्याने या वेळेत पोलिसांनी विविध भागात सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत नाकाबंदी करून संशयीत वाहनांची चौकशी सुरू केली आहे. तसेच मंगळसूत्र चोरी करण्यासाठी चोरटे अत्याधुनिक अशा स्पोर्टस बाईक वापरत असल्याने पोलिसांनी स्पोर्टस बाईक स्वारांची देखील कसून चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, शनिवारी तोंडाला पांढरे रूमाल बांधलेल्या मंगळसूत्र चोरट्यांनी उस्मानपुरा, जवाहरनगर आणि सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन महिलांचे मंगळसूत्र लांबविले होते. मंगळसूत्र चोरी करणाNयांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून पोलिस मंगळसूत्र चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

Advertisements

शहरातील ३८ सीसीटीव्ही कॅमेरे बंद
सेफ सिटी प्रकल्पाअंतर्गत शहराच्या विविध भागात ५२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यापैकी जवळपास ३८ सीसीटीव्ही कॅमेरे  बंद आहेत. सेफ सिटी प्रकल्पांतर्गत बसविलेले प्रमूख चौकातील ३८ सीसीटीव्ही वॅâमेरे बंद असल्याने शहराची सुरक्षा व्यवस्था वा-यावर असल्याचे दिसून येत आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!