Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : पोलीस असल्याची बतावणी करून , वृध्देच्या सहा तोळे, सोने लंपास

Spread the love

औरंगाबाद – रविवारी दुपारी साडेचार वा. औरंगपुरा परिसरात तीन भामट्यांनी ६५वर्षीय वृध्देस रिक्षाचालक लुबाडत असतात हातातील बांगड्या, अंगठ्या आणि सोन्याची चैन या वस्तू काढून ठेवा आम्ही पोलिस आहोत असे म्हणंत सहा तोळे सोने ज्याची किंमत १ लाख ७५ हजार रु.चे दागिने या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या मध्ये  पोलिसांनी सी. सी. टि.व्ही. फुटेज तपासले असून त्यामधे अस्पष्टपणे दोन चोरटे दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


जयश्री रसिकलाल गांधी(६५) रा. काल्डा काॅर्नर श्रेयनगर या किरकोळ सामान खरेदी करण्यासाठी औरंगपुरा परिसरात गेल्या होत्या नवकार मोबाईल शाॅपी समोर तीन भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करंत तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या,आणि सोन्याची चैन पर्स मधे ठेवा असे सांगितले. गांधी यांनी वरील दागिने काढून पर्स मधे ठेवतांना भामट्यांनी त्या लंपास केल्या घरी गेल्यावर त्यांनी पर्स उघडली असता त्यांना वरील प्रकार लक्षात आला.गुन्हेशाखा आणि क्रांतीचौक पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पी. एस.आय. गजानन सोनटक्के करंतआहेत.

या गुन्ह्याविषयी बोलताना  गुन्हे शाखा, सहाय्यक पोलिस आयुक्त , डाॅ. नागनाथ कोडे म्हणाले कि , शहरात पोलिसांच्या गस्त सुरु असतांना अशी घटना घडणे हे पोलिसांसाठी अशोभनीय आहे. कोणताही गुन्हा हा पोलिसांसाठी आव्हानच असतो.पण पोलिस शहर सुरक्षा करण्यासाठी कमी पडंत आहेत  असे म्हणणे चुकीचे ठरेल. 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!