Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हर्सुल रोडवर युवकाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय 

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : धावत्या रिक्षातून अचानकरित्या पडून गंभीर जखमी झालेल्या १९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान घाटी रूग्णालयात मृत्यू झाला. युवकाचा अपघाती मृत्यू नसून तो घातपात असल्याचा संशय व्यक्त नातेवाईकांनी व्यक्त केल्याने रविवारी (दि.१८) घाटी रूग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. सौरभ राजेंद्र हिंगमिरे (वय १९, रा.सारा वैभव, जटवाडा रोड) असे अपघातात जखमी होवून मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ हिंगमिरे हा युवक शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हर्सुल कारागृहासमोरून रिक्षात बसून जात होता. रिक्षातून अचानकरित्या तोल जावून खाली पडल्याने सौरभ हिंगमिरे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता उपचार सुरू असतांना शनिवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, सौरभ हिंगमिरे याच्या डोक्याला आणि गुप्तांगाला जखमा आढळून आल्याने नातेवाईकांनी सौरभचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे घाटीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यावर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी हर्सुल पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!