Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बारामतीकरांची पूरग्रस्तांसाठी दानपारमिता , अर्ध्या तासात जमा झाली एक कोटीची मदत , शरद पवार आज सातारा , सांगलीला देणार भेट

Spread the love

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आवाहन केलं अन् अवघ्या अर्ध्यातासात एक कोटी रुपयांची मदत जमा झाली. शरद पवार यांनी रयत भवनमध्ये शु्क्रवारी बारामती शहरातील व्यापाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. पूरग्रस्तांच्या मदतनीधीसाठी त्यांनी व्यापाऱ्यांना मदतीचं आवाहन केलं. या आवाहानाला प्रतिसाद देत व्यापारी आणि पदाधिकाऱ्यांनी भरभरून मदत केली. अवघ्या अर्ध्यातासात एक कोटी रुपयांचा निधी जमा झाला.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्या प्रतिष्ठानकडून 25 लाख रुपयांची मदत देण्यात आली. याशिवाय माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी पाच लाखांची मदत दिली. त्यानंतर बारामतीतल्या व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांसह धान्य, कपडे आणि भांड्यांची मदत देण्यात आली. याशिवाय सहकारी साखर कारखान्यांनी 400 पोती साखर देण्याचे जाहीर केले.

शरद पवार उद्या, शनिवारी पूरग्रस्त सांगली, सातारा भागाचा दौरा करणार आहे. या दौर्‍यात ते पूरग्रस्त भागांना भेटी देऊन तेथील नागरिकांनाही भेटणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे ही त्यांच्या समवेत असणार आहेत. सकाळी 09 वाजता ते तांबावणे (ता.फलटण, जि.सातारा) येथील पूरग्रस्त भागाची पाहाणी व नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 03 वाजता पलुस (ता.जि.सांगली) येथील पूरग्रस्त भागाची पाहाणी व नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासा देणार आहेत. सायंकाळी 05 वाजता ते सांगली येथील पूरग्रस्त व कॅम्पला ही भेट देणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!