Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Ahmadnagar : मागास महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लगट करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

मागास  महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांत विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी येथे ही घटना घडली आहे. दादा गोलांडे असे आरोपीचे नाव आहे. न्यूज १८ लोकमतने हे वृत्त दिले आहे.

Advertisements

मिळालेली माहिती अशी की, बेलवंडी येथे १५ जुलैला जमिनीच्या वादातून एका अनुसूचित जातीच्या  महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आली. एवढेच नाही तर आरोपी दादा गोलांडे याच्यासह त्याच्या साथिदारांनी पीडितेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. लज्जा निर्माण होईल, असे वर्तन पीडित महिलेशी करण्यात आले.

Advertisements
Advertisements

आरोपी दादा गोलांडे याने पीडितेसह तिच्या कुटूंबीयांना  दमदाटी करून त्यांना जातीवाचक शिविगाळही केली. पीडित महिलेसह तिचे कुटूंब मोलमजुरी व शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीची शेतजमीन आहे. परंतु, ही शेती हडपण्याचा दादा गोलांडे याचा इरादा आहे. १६ जुलैला आरोपींनी पीडित महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली होती. पतीचे हातपाय बांधून पिकअपमध्ये टाकून मारहान करत बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांसमोरही मारहाण केली. या प्रकरणी आरोपी दादा गोलांडे, गोरख गोलांडे, राजू गोलांडे, भाऊसाहेब गोलांडे याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!