News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करण्याची काँग्रेसची तयारी , पण त्याच्या निकाल त्यांच्यावरच अवलंबून : अशोक चव्हाण
वर्ल्डकप: भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध ३१ धावांनी पराभव; इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान कायम
नागपूर: विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
दिल्ली: १ जुलैपासून दिल्लीत विना अनुदानिक सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात
अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे शेतात नांगरनीचे काम सुरु असताना अचानक तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून शेतकरी तरुणाचा मृत्यू, दुपारी ४ वाजताची घटना
औरंगाबाद : दुचाकीला कारने धडक देऊन पाथरी येथील व्यापाऱ्याची दागिन्यांची बॅग लंपास केल्याप्रकरणी मोक्कातील आरोपी प्रताप म्हस्के याचा जामीन फेटाळला
नागपूर: यूट्युब बघून १२ वर्षीय विद्यार्थिनीने लावला गळफास, हंसापुरीतील घटना, शिखा विनोद राठोड,असे मृत विद्यार्थिनीचे नाव.
महाराष्ट्र युथ काँग्रेसचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी प्रवक्ते पद सोडलं, पक्षालाही दिली सोडचिठ्ठी
दिल्लीत उष्णता वाढल्याने ८ वीपर्यंतच्या शाळांची सुट्टी एक आठवड्यांनी वाढवली. शाळा आता 8 जुलै रोजी उघडणार.
जळगाव : मू. जे. महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणात पाच जणांना पुण्यातून अटक
सांगली : लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समितीच्यावतीने रविवारी सांगलीत विचारदर्शन प्रबोधन रॅली
राजस्थान- भरतपूरमध्ये ट्रॅक्टरला जलसमाधी; चौघांचा मृत्यू
पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात कोसळधार; हवामान खात्याचा अंदाज
भाजपाच्या संसदीय समितीची २ जुलै रोजी बैठक
पुढील २४ तासांमध्ये मुंबईत अतिवृष्टीचा इशारा
उत्तर प्रदेश- सदरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर दोन व्यक्तींकडून बलात्कार; गुन्हा दाखल