Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पाणी भरण्याच्या वादातून दिराने केला भावजयीचा खून

Advertisements
Advertisements
Spread the love

पाण्यावरून झालेल्या वादातून दीराने वहिनीची हत्या केल्याची घटना खार येथे शुक्रवारी घडली. नमिता पोखरे असे मृत महिलेचे नाव असून खार पोलिसांनी याप्रकरणी योगेश पोखरे (३५) याला अटक केली.
खार पश्चिमेकडील अमिना रोशन हाऊस खोली क्रमांक २ मध्ये निलेश पोखरे आणि योगेश पोखरे हे भाऊ कुटुंबींयांसोबत एकाच घरात राहतात. एकाच घरात राहत असले तरी दोन्ही कुटुंबात वाद होते. घरामध्ये पाण्याचा एकच नळ असून शुक्रवारी सायंकाळी पाणी आले त्यावेळी नमिता आणि योगेश यांच्यात पाणी भरण्यावरून वाद झाला.

Advertisements

वहिनी ऐकत नसल्याने संतापलेल्या योगेशने घरातील कोयत्याने तिच्या डोक्यावर प्रहार केला आणि वार केले. यानंतर योगेशने तेथून पळ काढला आणि खार पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना सर्व घटना सांगितली आणि त्यांना शरण गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला निलेशने तत्काळ नजीकच्या रुग्णालयात नेले. पण नमिताला दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!