Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अधिकाऱ्याची बॅटने धुलाई करणाऱ्या भाजप आमदाराला अखेर विशेष न्यायालयाने दिला जामीन , अधिकारी अद्याप आय सी यु मध्ये …

Advertisements
Advertisements
Spread the love

इंदूर  पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण  करणारा  आमदार आणि भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांचा  पूत्र आकाश विजयवर्गीय याला  भोपाळच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  त्याने केलेल्या मारहाणीत हा अधिकारी गंभीर जखमी झाला असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.  इंदूर परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे, या परिसरातील जुन्या जिर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना आकाश विजयवर्गीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. यादरम्यान स्वतः आकाश हे अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. आकाश इंदूर- ३ मतदारसंघातून आमदार आहे.

Advertisements

या प्रकरणी आकाश विजयवर्गीय याला  ७ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, विजयवर्गीयकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होते. सरकारी अधिकाऱ्याला मारहाण झाल्यामुळे इंदूरच्या न्यायालयाने जामीन फेटाळला होता. अखेर विजयवर्गीयने  भोपाळच्या विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

Advertisements
Advertisements

जुन्या जिर्ण झालेल्या घरांना तोडण्यासाठी अधिकारी आल्यावर स्थानिकांनी आकाश यांना बोलावले. त्यानंतर अधिकारी आणि आकाश यांच्यात घर पाडण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. त्यानंतर आकाश यांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीची चावी काढून घेतली. तुम्हाला १० मिनटांचा वेळ देतो येथून निघून जा नाहीतर जे होईल त्याची जबाबदारी तुमची असेल, अशी धमकी आकाशने  अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर त्याने बॅटने अधिकाऱ्यांना मारणे सुरू केले. यावेळी पोलिस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कसे-बसे अधिकाऱ्याला तेथून बाहेर काढले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!