Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करणाऱ्या भाजपनेत्याच्या आमदार पुत्राला अखेर अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

इंदूर पालिकेच्या अधिकाऱ्याला चक्क बॅटने मारहाण करणारे भाजपाचे आमदार आकाश विजयवर्गीय  अखेर पोलिसांकडून अटक करण्यात आली असून मोठ्या फौजफाट्यासह पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले आहे. या प्रकरणी आमदारासह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

इंदूर परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे, या परिसरातील जुन्या जिर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी आले होते. या अधिकाऱ्यांना आकाश विजयवर्गीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. यादरम्यान स्वतः आकाश हे अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. आकाश इंदूर- ३ मतदारसंघातून आमदार आहेत.

Advertisements
Advertisements

जुन्या जिर्ण झालेल्या घरांना तोडण्यासाठी अधिकारी आल्यावर स्थानिकांनी आकाश यांना बोलावले. त्यानंतर अधिकारी आणि आकाश यांच्यात घर पाडण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. त्यानंतर आकाश यांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीची चावी काढून घेतली. तुम्हाला १० मिनटांचा वेळ देतो येथून निघून जा नाहीतर जे होईल त्याची जबाबदारी तुमची असेल, अशी धमकी आकाश यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर आकाश यांनी बॅटने अधिकाऱ्यांना मारणे सुरू केले. यावेळी पोलिस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कसे-बसे अधिकाऱ्याला तेथून बाहेर काढले.

 

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!