Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आमदारा गजभिये यांची विधानभवनात कारकरेंच्या भूमिकेत एंट्री

Advertisements
Advertisements
Spread the love

नेहमीच वेगवेगळ्या पोशाखात अनोख आंदोलन करुन अधिवेशनात हजेरी लावणारे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी यंदाही सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असताना आमदार प्रकाश गजभिये यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या पोशाखात विधानभवनात एण्ट्री केली. यासोबतच गजभिये यांनी हातात फलक घेत “प्रज्ञाच्या शापाने मरण पावलेलो ही अंधश्रद्धा आहे, मी देशासाठी शाहिद झालो”, असं त्यावर म्हटलेलं आहे.

Advertisements

काही दिवसांपूर्वी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. प्रज्ञा म्हणाली होती, “हेमंत करकरेंनी मला खूप त्रास दिला होता, म्हणून मी त्यांना श्राप दिलेला आणि त्यामुळेच त्यांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला”, असं वादग्रस्त विधान केलं होते. प्रज्ञा ठाकूरच्या या विधानावर देशभरातून तिच्यावर टीका करण्यात आली होती. यालाच प्रतिउत्तर देत आमदार प्रकाश गजभिये विधानभवनात शहीद हेमंत करकरेंच्या पोशाखात दाखल झाले होते. यावेळी विधानभवनाच्या गेटजवळ गजभिये यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्नही केला होता. विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात गजभिये नेहमी वेगवेगळ्या पोशाखात येत असतात. गेल्यावर्षीही गजभिये शिवाजी महाराजांच्या पोशाखात आले होते. मात्र या पोशाखामुळे ते अडचणीत सापडले होते.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!