Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १६ जून रोजी सकाळी ११ वाजता राजभवन येथे होणार आहे. यामध्ये भाजपा, शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हेदेखील मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे महातेकर यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

Advertisements

रविवारी होणाऱ्या राज्य सरकार च्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षातर्फे एक नाव देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास केल्यानंतर अविनाश महातेकर यांच्या नावाची शिफारस पाठविली असल्याची माहिती ना रामदास आठवले दिली आहे.उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीयराज्यमंत्री ना रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महायुती सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा देण्यात येईल आणि मंत्रीमंडळात एक मंत्रिपद देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करीत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ना रामदास आठवले यांनी आभार मानले आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!