Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

झीनत अमान यांना ‘आर डी बर्मन जीवन गौरव’ पुरस्कार

Advertisements
Advertisements
Spread the love

आपले अप्रतिम सौंदर्य आणि जुन्या काळातील ‘मॉड’ भूमिकांमुळं सिनेरसिकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या आणि  मनं जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांना ‘आर डी बर्मन जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

Advertisements

येत्या २२ जून रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. झीनत अमान यांनी अभिनय केलेल्या सुमारे २४ हिंदी चित्रपटांना आर डी बर्मन यांचे संगीत लाभले. हा एक प्रकारचा विक्रमच मानला जातो. यातील किमान १९ चित्रपट सुपरहीट झाले आणि या यशात झीनत आणि आरडी या दोघांचाही महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे यंदा या पुरस्कारासाठी झीनत यांची निवड झाली आहे.

Advertisements
Advertisements

एक लाख रुपये आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. झीनत अमान या कार्यक्रमात पंचमदांच्या आठवणींना उजाळा देतील. ‘स्वरदा कम्युनिकेशन्स अँड इव्हेंट्स’च्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. याआधी संगीतकार दिवंगत यशवंत देव, प्रख्यात निवेदक अमीन सयानी यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!