हवाई दलाच्या विमानाला अपघात, दोघांचा मृत्यू
Advertisements
Advertisements
जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तांत्रिक बिघाडामुळं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
बडगामपासून ७ किलोमीटरवर असलेल्या गरेंद कलन गावात आज सकाळी ही घटना घडली. अपघातग्रस्त विमान ‘मिग-२१’ जातीचं असून अपघातानंतर स्फोट होऊन भडकलेल्या आगीत विमान जळून खाक झालं. भारताने पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्यानं काही वेळ स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, अपघात झाल्याचं कळल्यानंतर लोकांनी विमान पाहण्यासाठी गर्दी केली. दरम्यान, पोलीस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून घटनेची चौकशी सुरू आहे.
Advertisements
