Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“टीसी”वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

जम्मू काश्मिर मधील पुलवामा जिल्ह्यात राज्य राखीव दलाच्या तुकडीवर गुरुवारी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळलेली असताना लोणावळ्यातील शिवाजी चौकात पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणार्‍या रेल्वेच्या टिकिट कलेक्टर (टीसी) वर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कलम 153 बी नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची गंभिर दखल घेत रेल्वे प्रशासनाने तातडीने सदर टीसीचे खात्यातून निलंबन केले आहे.
उपेंद्रकुमार श्रीवीर बहादुरसिंग (वय 39, रा. श्रीकृष्ण विहार काॅलनी, पटणा बिहार) असे या टिसीचे नाव असून तो लोणावळा स्थानकावरच कामाला आहे. सुरक्षा जवानांवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात निषेध सभा होत असताना हा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला, दरम्यान पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली असल्याचे सांगत जनसमुदायाला शांत राहण्याचे आवाहन केले.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!