Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

…आणि राहुल गांधी गोरे – मोरे झाले !!

Advertisements
Advertisements
Spread the love

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज गुजरात राज्यातील वलसाड येथील सभेसाठी मंचावर पोहोचल्यानंतर एका महिलेने राहुल यांचे चक्क चुंबन घेत स्वागत केले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे राहुल यांना काय करावे हेच सूचत नव्हते.
राहुल यांचे मंचावर आगमन झाल्यानंतर माइकवर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी महिलांचा एक गट मंचावर आला. महिला आपल्या स्वागताला येत आहेत हे पाहून राहुल त्यांचा मान राखण्यासाठी उठून उभे राहिले. त्याचवेळी सर्वात पुढे असलेल्या महिलेने राहुल यांच्या गालावर चुंबन घेतले. राहुल यांनी स्मित केले. त्यानंतर महिलांनी राहुल यांच्या गळ्यात पुष्पमाला घातली. २०१४ मध्ये आसामच्या दौऱ्यावर असताना राहुल यांना अशाच अनुभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी राहुल पक्षाचे उपाध्यक्ष होते. आसाममधील जोरहाट येथील एका कार्यक्रमात अचानक दोन महिलांनी राहुल गांधी यांच्या गालावर चुंबन घेतले होते.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!