मुख्यमंत्री फडणवीस यांची श्रीसंत नरहरी संस्थानला भेट

देऊळगांव राजा शहराजवळ आमना नदी काठावरील श्रीसंत नरहरीनाथ महाराज पैठणकर यांच्या संस्थानला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार प्रतापराव जाधव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, संस्थानचे अध्यक्ष मोहननाथ भानुनाथ पैठणकर, जि.प अध्यक्षा उमा तायडे, उद्बोधनाथ पैठणकर, माधव गिते, वसंत थिगळे, रवी सुरडकर, रोहीत सराफ आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मोहननाथ महाराज पैठणकर लिखित ज्ञानेश्वर महाराज प्रणीत नाथ परंपरा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीसंत नरहरी महाराज पैठणकर यांचे पूजन केले. संस्थानच्यावतीने मुख्यमंत्री यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोहननाथ महाराज यांनी संस्थानची माहिती दिली.