चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या
Advertisements
Advertisements
माणुसकीला काळिमा फासणारी घटना
Advertisements
माहिममध्ये एका चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रात्री जवळपास तीन वाजण्याच्या सुमारास मुलगी बेपत्ता झाली होती. यानंतर तिचा शोध सुरु झाला होता. सकाळी मुलीचा मृतदेह सापडला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडीवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या करण्यात आली आहे. माहिम पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
डीसीपी विक्रम देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पीडित चिमुरडी माहिममध्येच राहत होती. बुधवारी रात्रीपासून ती बेपत्ता होती. तिचं अपहरण करुन बलात्कार आणि हत्या करण्यात आली आहे. आम्ही याप्रकरणी तपास सुरु केला असून सीसीटीव्ही तपासणार आहोत’.
Advertisements
Advertisements
