Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

छत्तीसगड: १० नक्षलवाद्यांचा खात्मा

Advertisements
Advertisements
Spread the love

छत्तीसगड: सुरक्षा यंत्रणांनी केला १० नक्षलवाद्यांचा खात्मा

Advertisements

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. एसपी मोहित गर्ग यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रीक्ट रिझर्व गार्ड्सच्या जवानांनी ही कामगिरी बजावली आहे.

Advertisements
Advertisements

शनिवारी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये एक स्थानिक महिला ठार झाली होती. त्यानंतर बीजापूरमध्ये काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. गुरुवारी सकाळी गर्ग यांच्या टीमने नक्षलवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले. काही तासांच्या चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांनी १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला. नक्षलवाद्यांची ११ अत्याधुनिक हत्यारंही जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत एकही जवान जखमी झाला नसून इतर नक्षलवाद्यांचा तपास सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!