Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : कोरोनाचा देशात पुन्हा उच्चांक , ६२ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद

Spread the love

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ६२ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एका दिवसात लागण होण्याचा हा या वर्षातील उच्चांक आहे. १६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले असून यासोबत रुग्णसंख्या १ कोटी १९ लाखांवर पोहोचली आहे. शुक्रवारी देशात ५९ हजार ११८ रुग्ण आढळले होते. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान शुक्रवारच्या तुलनेत देशात शनिवारी रुग्णसंख्या ५.३ टक्क्यांनी वाढली आहे. यासोबत देशात गेल्या २४ तासात २९१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ६१ हजार २४० इतकी झाली आहे. याशिवाय ३० हजार ३८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १ कोटी १२ लाख ९५ हजार २३ जण करोनामुक्त झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला ४ लाख ५२ हजार ६४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ५ कोटी ८१ लाख ९ हजार ७७३ जणांचं लसीकरण झालं आहे.

गेल्या वर्षी ३० जानेवारीला भारतात सर्वात पहिला करोना रुग्ण सापडला होता. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि त्यानंतर ब्राझीलचा क्रमांक आहे. याशिवाय देशात सर्वाधिक करोना फटका बसलेल्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!