Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : कोरोना संकट काळातही पेट्रोल -डिझेलचे भाव वाढवून ग्राहकांची लूट

Spread the love

देशातील नागरिक कोरोनाच्या संसर्गामुळे त्रस्त असतानाच सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढवल्या जात आहेत. त्यामुळे सामान्य माणूस अधिकच संकटात सापडला आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी IOC ने सलग 21 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. शनिवारी मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव 87.14 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे भाव 78.71 रुपये प्रति लीटर इतके आहेत. दिल्लीमध्ये तर पेट्रोलपेक्षा महाग डिझेल झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये रोज अपडेट होत असतात, दररोज सकाळी 6 वाजता या  इंधनांचे नवे दर येतात. पेट्रोलचे भाव प्रति लीटर 25 पैशांनी तर डिझेलचे भाव  प्रति लीटर 21 पैशांनी वाढले आहेत.

अशा आहेत देशातील मोठ्या शहरामधील पेट्रोल-डिझेलच्या किंमती

-मुंबई : पेट्रोल 87.14 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 78.71 रुपये प्रति लीटर

-दिल्ली :  पेट्रोल 80.38 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 80.40 रुपये प्रति लीटर

-नोएडा :  पेट्रोल 81.04 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 72.48 रुपये प्रति लीटर

-लखनऊ :  पेट्रोल 80.94 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 72.37 रुपये प्रति लीटर

-चेन्नई :  पेट्रोल 83.59 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 77.61 रुपये प्रति लीटर

-कोलकाता :  पेट्रोल 82.05 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 75.52 रुपये प्रति लीटर

-भोपाळ :  पेट्रोल 88.03 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 79.82 रुपये प्रति लीटर

आपलं सरकार

Click to listen highlighted text!