Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Happy New Year : या १०० अब्ज मध्ये तुम्हीही एक आहात ….

Spread the love

सोशल मीडियाच्या काळात प्रत्यक्ष गाठी -भेटीतून शुभेच्छा देण्यापेक्षा यंदा व्हॉट्सअॅपचाच मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.  नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तर व्हॉट्सअॅपवर अक्षरशः  शुभेच्छा संदेशाचा महापूरच आला. या महापुरात तुम्हाला आणि तुमच्या मॅसेजला धरून जगभरात व्हॉट्सअॅपवर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे सुमारे १०० अब्ज मेसेज पाठवण्यात आले असल्याचे वृत्त आहे.

या वृत्तानुसार नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपासून ते मध्यरात्रीपर्यंत अशा २४ तासांच्या काळात जवळपास १०० अब्ज मेसेज जगभरात पाठवण्यात आले होते. फक्त भारतातच ३१ डिसेंबर रोजी युजर्सने २० अब्जाहून अधिक मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठवले आहेत. व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात १०० अब्ज मेसेज पाठवण्यात आले. त्यामध्ये १२ अब्ज फक्त फोटो असलेल्या शुभेच्छा होत्या. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मेसेज पाठवणारा आणि स्वीकारणाराच वाचू शकत असल्याचे व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे. ३१ डिसेंबर रोजी पाठवण्यात आलेल्या मेसेज हे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे असतील असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. वर्षभरात व्हॉट्सअॅपवर टेक्सट मेसेज, स्टेट्स, पिक्चर मेसेज, कॉलिंग आणि व्हॉइस नोट्स या फिचर्सचा सर्वाधिक वापर झाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान, ३१ डिसेंबर २०१९ नंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या मोबाइलमधून व्हॉट्सअॅप बंद करण्यात आले आहे. त्याशिवाय, काही अॅण्ड्राइड आणि आयओएस प्रणालीवर चालणाऱ्या काही मोबाइलवर एक फेब्रुवारी २०२० नंतर व्हॉट्सअॅप कार्यरत राहणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!