Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Uttar Pradesh : सपा-बसपाचे अधिकृत जागा वाटप जाहीर : राहुल-सोनियांची जागा सोडली

Advertisements
Advertisements
Spread the love

समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) ने उत्तर प्रदेशात ऐतिहासिक आघाडी केल्यानंतर आता उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात सुद्धा एकत्र आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे.  अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये मात्र दोन्ही पक्ष उमेदवार देणार नाहीत. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने गेल्या काही दिवसांपूर्वी आघाडी करत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात ८० पैकी ७६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisements

मध्य प्रदेशात समाजवादी पार्टी फक्त तीन जागा लढवणार आहे. तर बाकीच्या बहुजन समाज पार्टी लढवणार आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट, टीकमगड, खजुराहो या तीन जागांवर समाजवादी पार्टीचे उमेदवार असणार आहेत. दुसरीकडे, उत्तराखंडमध्ये समाजवादी पार्टीने फक्त एकाच जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येथील पौडी गढवाल मतदार संघातून समाजवादी पार्टी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे.  दरम्यान, मध्य प्रदेशात लोकसभेसाठी २९ जागा आहेत. तर उत्तराखंडमध्ये ५ जागा आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यातील प्रत्येकी ३८ जागा लढवणार आहेत. तर दोन जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!