IndiaNewsUpdate : अखेर रामदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल , आणखी एका व्हायरल व्हिडिओची सोशल मीडियात मोठी चर्चा

नवी दिल्ली : अखेर अॅलोपॅथी व डॉक्टरांवर केलेल्या विधानामुळे कोरोना काळात योग गुरू रामदेवबाबा यांच्याविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून योगगुरु रामदेवबाबा चर्चेत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही रामदेवबाबा यांना अशी विधाने न करण्याचा सल्ला दिला आहे. रामदेव बाबा यांच्यावर साथरोग कायदा, १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Indian Medical Association (IMA) files police complaint against Yog Guru Ramdev for committing offences under Epidemic Diseases Act, 1897, Disaster Management Act, 2005 with all other relevant provisions of law
— ANI (@ANI) May 27, 2021
दरम्यान इतके सगळे होऊनही रामदेवबाबांचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओवरून देखील रामदेवबाबा यांच्यावर टीका होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते आपल्या अटकेवर प्रतिक्रिया देतांना म्हणाले, “अटक तर त्यांचा बाप सुद्धा करू शकत नाही.” हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ कधीचा आहे. याबाबत माहिती मिळाली नसली तरी सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्विट करुन नेटकऱ्यांनी रामदेवबाबा यांच्यावर टीका केली आहे.
"अरेस्ट तो उनका बाप भी नहीं कर सकता"
ये कानून को खुली चुनौती दे रहा है। सरकार बताए कि वो किस तरफ है? pic.twitter.com/QEkEkdjcyW— Ruchira Chaturvedi (@RuchiraC) May 25, 2021
या व्हायरल व्हिडिओमध्ये रामदेवबाबा म्हणतात कि , लोक कधीकधी रामदेवबाबा यांना अटक करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर चालवतात तर कधी रामदेवबाबा ठग असल्याचे ट्रेंड चालवतात. चालू द्या, पण आता आपण हे गुण देखील शिकलो आहोत आणि आम्ही जे लोक जो ट्रेंड चालवितो तो देखील शीर्षस्थानी असतो.रामदेवबाबा यांच्या या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी केंद्र सरकारलाही ट्रोल केले आहे. स्वामी रामदेव हे भाजप आणि पंतप्रधान यांच्या जवळचे असल्यामुळे, असे वक्तव्य करीत आहेत, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.