AurangabadNewsUpdate : सोशल मिडिया वर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे पोलीसांनी रोखला बालविवाह !!

औरंगाबाद : सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आले. ही घटना बुधवारी सकाळी सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे घडली. पोलिसांनी बालविवाह रोखल्यानंतर नातेवाईकांनी घरासमोरील मंडप हटवला.
सिल्लोड तालुक्यात बोरगाव बाजार येथे १४ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती आज सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती.
अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याचे समजल्यावर शहर सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी याबाबत तातडीने सूत्रे हलवत या विवाहाविषयी खात्री करून घेतली. मात्र, विवाहस्थळ हे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असल्यामुळे निरीक्षक बागवडे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून त्यांना प्रकरणाची माहिती दिली. यावेळी लग्नाची लगबग सुरू असतानाच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी बोरगाव बाजार गाठून बालविवाह रोखला. शिवाय वधू-वरांकडील दोन्ही पालकांची आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन उभयंतांचे समुपदेशन केले.
……