राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राजेश टोपे यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी दिवसभरात राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज समोर आली. त्यानंतर रात्री उशिरा राजेश टोपे यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 18, 2021