UttarPradeshCoronaEffect : योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचाही कोरोनाने घेतला बळी…

उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या महिन्यांना त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना लखनऊ येथे दाखल करण्यात आले होते. ते कोरोनाशी लढा देत होते..अशातच त्यांना किडनी आणि ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. ज्यानंतर त्यांना शुक्रवारी रात्री व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यातच आज त्यांचा मृत्यू झाला. 12 जुलै रोजी त्यांची कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आली होती. त्यांनंतर त्यांना लखनऊ येथे संजय गांधी पीजीआय रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना गुरुग्राम मेंदाता रुग्णालयात हलविण्यात आले. काल आलेल्या बातमीनुसार त्यांनी किडनी काम करणं बंद झाली होती. त्यानंतर त्यांच्या शरीरातील अवयव निकामी होत गेले.