AurangabadNewsUpdate : दंडाची रक्कम वसूल करतांना वाहतूक पोलिस वापरतात “प्लास्टिक” ची झोळी…!!

सर्वत्र कोरोनाची दहशत असताना कोरोनापासून बचाव करण्याचे कुठलेही साधन जवळ नसताना स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस ड्युटी करीत आहेत . विशेष म्हणजे शहरातील वाहतूक पोलीस मोठी जोखीम पत्करून लोकांकडून दंडाची रक्कम वसूल करतांना पैशाला हात न लावता त्यांना थेट कॅरीबॅगमधे दंडाची रक्कम टाकायला सांगत आहेत. त्यातच सोशल डिस्टंसिंगचे पालन केल्याचे त्यांना वाटते खरे पण कोरोनाच्या बाबतीत हि मोठी रिस्क आहे आणि राज्याचे गृहमंत्री पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात पावणे सहा लाखांची वसुली केल्याचे सांगतात.
याबाबत आमच्या औरंगाबाद प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार , या गोष्टीचा राग येवून एका मोटरसायकल चालकाने पोलिसांना फैलावर घेतले. पोलिस आयुक्तांनी मोटर वाहन अॅक्ट प्रमाणे वाहन चालकांकडून संचारबंदीच्या काळात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्याचे कारण काय ? दोन महिन्यांपासून सुरु लाॅकडाऊन मुळे त्रस्त झालेली जनता पोलिसांना दंडाची रक्कम देण्यास तयार होत नाही. कारवाई करा म्हणतात. या गोष्टीनेही वाहतूक पोलिस सुन्न होत आहेत. दरम्यान वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे केसेस कराव्या लागतात. तर कोणत्याही परिस्थितीत दंडाची रक्कम देत नाही असा पावित्रा शहरातीळ नागरिक घेताना दिसत आहे. या बाबत शहर वाहतूक पोलिस निरीक्षकांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. हा प्रकार वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त दिनेश कोल्हे यांना समजताच त्यांनी खुलासा केला की, जनतेकडून लाॅकडाऊनच्या काळात दंडाची रक्कम वसूल करण्यात आम्हाला कोणताही आनंद होत नाही. बर्याचवेळेस आम्ही संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणार्या नागरिकांना समज देऊन सोडतो.लाॅकडाऊनचा उद्देश सफल व्हावा कोरोना पासून संसर्ग पसरु नये असा या कारवाई मागचा उद्देश आहे. पण ७०टक्के लौक लाॅकडाऊनच्या काळात गांभिर्य पाळंत नसल्यामुळे विनाकारण मोटरसायकलवर फिरतांना दिसतात व आम्हाला कारवाई करावी लागते.