MubaiNewsUpdate : कोविड ड्युटीवरील निवासी डॉक्टरांच्या निवासस्थानाला आग, २५ डॉक्टर सुखरूप बचावले

मुंबईतील धोबी तलाव परिसरात रात्री उशिरा मेट्रो सिनेमा चित्रपटगृहाजवळ असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. याठिकाणी कोविड ड्युटीवरील निवासी डॉक्टरांना पर्यायी निवासस्थाने देण्यात आली आहेत. दरम्यान या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले आणि काही वेळातच २५ डॉक्टरांना सुखरूपपणे आगीतून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. रात्री उशिरापर्यंत हे बचाव कार्य चालू होते. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
About 25 resident doctors who were at the hotel have been evacuated safely. Firefighting & rescue operations still underway: Mumbai Fire Brigade https://t.co/wlMpPd9zDd pic.twitter.com/SrTmH5SN1g
— ANI (@ANI) May 27, 2020
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ फायर गाड्या आणि ४ जंबो टँकर घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली . मात्र ही आग नक्की कशामुळे लागली याचे करण अद्याप समजू शकले नाही. यावेळी या ठिकाणी सुमारे 25 निवासी डॉक्टर होते. सर्व डॉक्टरांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आल्याचे, मुंबई फायर ब्रिगेडने सांगितले आहे. या घटनेमुळे कोणीही जखमी झालेले नाही. बचावकार्य संपल्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून बाकी कुणी हॉटेलमध्ये अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.