Aurangabad : विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांवर पोलिसांची करडी नजर

अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी घेतला कायदा-सुव्यवस्थेचा आढावा
औरंंंगाबाद : विधानसभा निवडणुक निर्विवादपणे पार पाडण्यासाठी इच्छुक उमेदवारांवर करडी नजर ठेवा; तसेच शांतताभंग करणारे दंगेखोर आणि राडेबाजांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करा, धार्मिक नेत्यांशी संवाद साधा, असे आदेश राज्याचे विशेष कृती दलाचे पोलीस महासंचालक राजेंद्रसिंग यांनी वरिष्ठ पोलीस आधिका-यांच्या आढावा बैठकीत दिले. गणपती उत्सवानिमित्त राजेंद्रसिंग यांनी सोमवारी (दि.२६) परिक्षेत्रातील पोलीस आधिका-यांची आयुक्तालयात बैठक घेतली होती.
येणा-या विधानसभा निवडणुक तसेच गणपती उत्सव राज्यात शांततेत पार पाडण्यासाठी राज्याचे विशेष कृती दलाचे पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांनी सोमवारी पोलीस आयुक्तालयात परिक्षेत्रातील पोलीस आधिका-यांची बैठक घेतली होती. या बैठकीत परिक्षेत्रातील विश्ोष महानिरीक्षक रविंद्र वूâमार सारंगल, ग्रामिन पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, बिडचे हर्षप्रसाद, उस्मानाबादचे राजतिलक रोशन आणि जालना चे एस.चैतन्य यांच्यासह पोलीस आयुक्त चिरंजिव प्रसाद यांच्यासह वरिष्ठ पोलीस आधिका-यांची उपस्थित होते. यावेळी बोलताना राजेंद्रसिंग यांनी सांगितले कि, विधानसभा लढण्यासाठी विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांवर करडी नजर ठेवा.
मागील विधानसभा आणि गणोशोत्सव दरम्याण शांतता भंग करणा-या राडेबाज दंगेखोरंविरूध्द तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाइ करा, उत्सव आणि निवडणुक दरम्याण रोडवर पोलीसांचे पथक तैनात असले पाहिजे, तसेच कोणत्याही घटना कळताच तात्काळ पोलीसांनी घटनास्थळी पोहोचुन कारवाइ करावी, शांतता राखण्यासाठी धार्मिक नेत्यांसह राजकारण्याशी देखील संवाद वाढवण्यावर पोलीस प्रशासनाने भर दयावी अशी सुचना त्यांनी केली.