Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#RafaleScam : आता खूप झाले , पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात गुन्हाच दाखल करायला हवा : काँग्रेस

Spread the love

काँग्रेसने बुधवारी राफेल विमान करारावरून पुन्हा एकवार सरकारला धारेवर धरले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एफआयआर दाखल करण्याची वेळ आली आहे,’ अशा तीव्र शब्दांत काँग्रेसने टीकेची झोड उठवली.
‘राफेल करारातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी उघडपणे समोर येत आहे. पंतप्रधान मोदींनी डसॉल्ट एव्हिएशन कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी अधिकारांचा गैरवापर केला आणि जनतेचं नुकसान केलं,’ असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुर्जेवाला म्हणाले.  ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम १३(१) (ड) नुसार तसेच भारतीय दंड विधानाच्या अन्य कलमांतर्गत हा गुन्हा आहे. आता पंतप्रधान मोदींवर आणि राफेल करार घोटाळ्यातील प्रत्येक दोषीवर एफआयआर दाखल करण्याची वेळ आली आहे,’ असं सुर्जेवाला म्हणाले.

दरम्यान या प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता खूपझाले.

अशा शब्दात ट्विट केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!