Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SushmaAndhareNewsUpdate : आ. संजय शिरसाट यांच्या क्लिनचिटवर सुषमा अंधारे यांची प्रातिक्रिया , न्यायालयात दावा दाखल केलाय …

Spread the love

पुणे : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी एकांगी पद्धतीने क्लीन चीट दिली जात असेल, तर सरकारने चौकशी समिती कशाला नेमली. याप्रकरणात सर्व न्याय प्रक्रियेस हरताळ फासला गेला आहे. महिला आयोगास एकतर्फी अहवाल कसा पाठवला गेला ते स्पष्ट करावे, असे आव्हान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिले आहे.

सत्ता चालवण्यासाठी अशाप्रकारे महिला अत्याचार होताना सरकारकडून एकतर्फी नाटक केले जात आहे, असा आरोपही त्यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर केला. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी पुणे शहाराध्यक्ष गजानन थरकुडे यांची देखील उपस्थिती होती.

नेमके प्रकरण काय?

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभेमध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी अंधारे यांनी पोलिस ठाण्यात शिरसाठ यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली होती, तसेच पुणे न्यायालयात विनयभंग आणि अब्रूनुकसानीचा दावा शिरसाट यांच्या विरोधात दाखल केला होता. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांनी शिरसाट यांना नुकतीच क्लीन चीट दिली आहे.

न्यायालयात जाण्याचा इशारा

दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे म्हणाल्या की, छत्रपती संभाजीनगर येथील एका आमदार याने थिल्लर बोलून त्यांना मोठे करण्याची माझी इच्छा नाही. सभ्य लोकांशी बोलावे असे मला वाटत आहे, असभ्य लोकांशी मी बोलत नाही. संबंधित आमदाराने असभ्य, सवंग भाषा केली. पोलिस ठाण्यात आम्ही दाद मागतो परंतु न्याय मिळत नसेल, तर आम्ही न्यायालयात जाऊ. अशावेळी सरकार एखादी चौकशी समिती नेमू सांगतात.

फडणवीसांनी उत्तर द्यावे

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वकिलीचे ओळखपत्र दाखवले होते. म्हणून त्यांनी मला वकील म्हणून मार्गदर्शन करावे की, एखादी चौकशी समिती नेमली असेल तर त्याचा अहवाल येण्यापूर्वी कोण स्वतःला निर्दोष कसे सांगू शकते. नेमकी कोणती चौकशी समिती सरकारने नेमली, कोणत्या दर्जाचा अधिकारी होता, माझे म्हणणे काय हे समजून घेण्यास मला एकदाही बोलावणे आले नाही, माझी बाजू मांडण्याची देखील संधी दिली नाही. त्यामुळे एकाकंगी चित्र रंगवले जात आहे. मला कोणते पत्र पाठवले गेले नाही, समन्स अथवा वॉरंट ही मला आधुनिक काळात व्हॉटसअपवर हजर राहण्याची नोटीस पाठवली नाही.

याबाबत न्यायालयात दावा

संसद बाहेर ज्या कुस्ती खेळाडू महिला लढत आहे त्यांना न्याय मिळत नाही तसाच मला न्याय मिळत नाही. शीतल म्हात्रे प्रकरणात मुले समोर नव्हती तरी त्यांना अटक केली गेली. माझ्या माहिती प्रमाणे महिला आयोग यांच्याकडे माझ्या केसबाबत कोणता अहवाल दिला गेला नाही. त्यामुळे संबधित पोलिसांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी देखील अंधारे यांनी केली. याबाबत सिव्हील आणि क्रिमिनल दावा मी न्यायालयात दाखल केला आहे. न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यावर याबाबत सुनावणी होईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!