Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SSCResultNewsUpdate : दहावी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा संपली…

Spread the love

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दि २ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

१. www.mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://ssc.mahresults.org.in

या अधिकृत संकेतस्थळावर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. मार्च २०२३ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषय निहाय मिळालेले गुण या संकेतस्थळांवरुन पाहता येतील तसेच गुणांची प्रिंट आउट घेता येईल.

राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!