Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharshtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांना मिळाला दिलासा…. ठाकरे गटाला मोठा झटका

Spread the love

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल सुनावला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या १६ आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार असल्यामुळे, ते आमदार पात्रच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा निकाल पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने दिला आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हा निकाल वाचून दाखवला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्त पी एस नरसिंहा यांचा समावेश आहे.

 

  • भरत गोगावले प्रतोद म्हणून नियुक्ती बेकादेशीर, अधिकृत व्हिप कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण

 

  • अपात्रतेपासून वाचण्यासाठी आम्हीच खरा पक्ष आहोत, हा बचाव होऊ शकत नाही

 

  • सरकारवर शंका घेण्याचे कारण राज्यपालांकडे नव्हते. बहुमत चाचणी बोलावण्याची गरज नव्हती. पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी बहुमत चाचणीचा वापर नको

 

  • उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पुनर्स्थापित करण्याचा निर्णय दिला असता.

ठाकरेंच्या बाजूने काय काय?

– प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी मान्य

– गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर

– फुटलेला गट बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा दावा करु शकत नाही

 

जून २०२२ मध्ये प्रकरण सुप्रीम कोर्टात आले २७ सप्टेंबर २०२२ पासून सुनावणी सुरु झाली होती. परंतु पुढे अनेक वेळा सुनावणी टळत गेली. त्यानंतर सत्तासंघर्षाच्या कायदेशीर लढाईत १४ फेब्रुवारी ते १६ मार्च अशी सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज किशन कौल, महेश जेठमलानी, मणिंदर सिंह, राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केले. या खटल्यातील सुनावणीदरम्यान राज्यपालांच्या भूमिकेपासून विविध घटनात्मक मुद्दे समोर आले.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात अभूतपूर्व बंडखोरी केली. त्यांच्या नेतृत्त्वात तब्बल ३९ शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बंडाचे निशाण फडकवले. त्यावेळी बंडखोरी केलेल्या १६ आमदारांना अपात्र करण्याची नोटिस त्यावेळचे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी दिली होती. पण त्याआधीच त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आले होते.

MaharshtraLive : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल पाहता येईल लाईव्ह , राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यास सांगणे चुकीचे

 

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

आपलं सरकार

Click to listen highlighted text!