Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : ईव्हीएमच्या मुद्यावरून अजित पवार , खा. संजय राऊत यांच्यात ठिणगी …

Spread the love

मुंबई : ईव्हीएमच्या मुद्यावरून विरोधी पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक आणि त्यानंतर आपलं भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएमबद्दल असलेल्या शंकांचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते. विरोधकांच्या या आक्षेपांवर सत्ताधारी नेत्यांकडून टीका होत आहे. परंत, महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते अजित पवार यांनी मात्र विरोधी पक्षांच्या भूमिकेच्या विरोधात निवेदन केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांचा सामाचार घेतला आहे.

या विषयावर बोलताना विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी आपला ईव्हीएम मशीनवर विश्वास असल्याचे नमूद कारून म्हटले आहे की, “ईव्हीएममध्ये घोळ करता आला असता, तर देशातील अनेक राज्यात विरोधी पक्ष सत्तेत आलेच नसते. एवढ्या मोठ्या देशात गडबड कुणी करू शकत नाही. पराभवाचे कारण काही लोक ईव्हीएमवर ढकलून देत आहेत,” असे अजित पवारांनी सांगितलं. या वक्तव्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एकमत नसल्याचे बोलले जात आहे.

देशातील लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही : संजय राऊत

जीत पवर त्यांचे वक्तव्य येताच शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. “अजित पवार हे महाविकास आघाडीतील सहकारी आहेत. अजित पवारांचा ईव्हीएमवर विश्वास आहे, तर तो त्यांचा मुद्दा आहे. पण, देशाचा नाही. देशातील लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. भाजपाच्या भक्त आणि अंधभक्तांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. पण त्यामुळे अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे मला वाटत नाही,” असा टोला संजय राऊतांनी लगावाला आहे. दरम्यान संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समाचार घेतला आहे. “एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकारी नाही. गद्दारांना रस्त्यावर पकडून मारले पाहिजे, हा बाळासाहेबांचा विचार होता. बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर गद्दारांविरोधात लढले.” बाळासाहेबांचा हा विचार राज्यातील जनता अंमलात आणेल, अशी भीती सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० गद्दार आमदारांना आहे. त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आली आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!