Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : महाविकास आघाडीचं ठरलं , २ एप्रिलला संभाजीनगरात सभा …

Spread the love

मुंबई : एकीकडे राज्यात आगामी निवडणुकांच्या दृष्टीने शिंदे – फडणवीस सरकार कमला लागले असून दुसरीकडे पुण्याच्या पोटनिवडणुकीनंतर भाजपची कसब्याची परंपरागत जागा महाविकास आघाडीने मिळवल्यानंतर राज्यात आघाडीची ताकद वाढविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या सभेचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे .


राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होताच  मविआ शिंदे आणि फडणवीस सरकारला चितपट करण्याची योजना आखणे सुरु केले आहे . या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्प संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची एक बैठक पार पडली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ‘अजिंक्यतारा’ या शासकीय निवासस्थानी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबतची माहिती देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे की,  “महाराष्ट्रामध्ये भविष्यकाळात तिन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे सभा घेण्याचं नियोजन करत आहे. त्यासाठी १५ तारखेला पुन्हा एकदा बैठक बोलवली आहे. पुढील काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सभा घेण्याचे ठरवले आहे. येत्या २ एप्रिलला महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेची सुरवात छत्रपती संभाजीनगर येथून होईल. या सभेची जबाबदारी अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांच्यावर देण्यात आली आहे. ही संयुक्त सभा मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे पार पडणार आहे.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!