Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अयोध्या प्रकरणात निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींनाही राज्यपालपदाची संधी…

Spread the love

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी जाहीर केलेल्या यादीत अब्दुल नजीर यांचीही आंध्र प्रदेशाचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. अब्दुल नजीर सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश असून त्यांचा समावेश असणाऱ्या ५ सदस्यीय खंडपीठाने संवेदनशील अयोध्या वादाचा न्यायनिवाडा केला होता. गेल्या महिन्यातच ते सेवानिवृत्त झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अयोध्या वादाचा निर्णय दिला होता. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे या खंडपीठाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांची यापूर्वीच राज्यसभेच्या सदस्यत्वपदी निवड करण्यात आली आहे. तर आता या खंडपीठातील अन्य एक न्यायाधीश असणारे अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान त्यांच्या रिटायरमेंटवेळी आयोजित सोहळ्यात त्यांनी केलेले एक विधान चर्चेचा विषय ठरला होता. ते म्हणाले होते – ‘अयोध्या वादात इतर ४ न्यायमूर्तींच्या विरोधात मत नोंदवून मला समाजाचे हिरो बनता आले असते. पण मी राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान दिले.’ उल्लेखनीय बाब म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या बाजूने एकमताने निर्णय दिला होता. न्यायमूर्ती नजीर हे तीन तलाकच्या विरोधात निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठातही समावेश होता.

कोण आहे न्यायमूर्ति नजीर?

न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आहेत. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९५८ रोजी झाला. नजीर यांच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे लहान वयातच त्यांच्या अंगावर कौटुंबिक जबाबदाऱ्या पडल्या. त्यांनी पदवीचे शिक्षण घेत्लयानंतर कायद्याचे शिक्षण घेतले. कर्नाटकच्या स्थानिक न्यायालयात वकिली केली. त्यानंतर बंगळुरु हाय कोर्ट व नंतर सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती .

 

राष्ट्रपतींनी केली १३ राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती

 


 

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mini Truck / Chotta Hathi :  For More details call now : 9762041481

 


LET US BE YOUR SOCIAL MEDIA MANAGER-

We can keep your business connected by managing and updating your pages to help engage with your target audience and increase you public awareness of your business through proper management.

For More details WhatsApp on: 9420379055


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!