Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रपोज नाकारल्याने तो थेट तिच्या बाथरूममध्ये पोहचला…

Spread the love

अमरावतीमधील भातुकली तालुक्यात एक संतापजनक घटना घडली. मुलीने प्रेमाचे प्रपोज नाकारल्यानंतर मुलाने ती आंघोळ करत असताना आरोपी तरूण चक्क तिच्या बाथरूममध्ये डोकावला. तिला तो दिसताच ओरडल्याने तो तिथून निघून गेला. या प्रकरणी नवल नामक (वय २१) या तरूणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नवल हा तरुणीच्या ओळखीचा होता. दोन वर्षांपासून ती मैत्रीच्या नात्याने त्याच्यासोबत बोलायची. मात्र, त्याने त्यातून वेगळाच अर्थ घेऊन पंधरा दिवसांपूर्वी “मला तू आवडतेस”, असे असे सांगून प्रपोज केले. मात्र, तिच्या मनात त्याच्याविषयी काही नसल्याने तिने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर पीडित तरूणीने त्याच्याशी बोलणे देखील बंद केले. मात्र, त्यानंतर तो सतत तिचा पाठलाग करून तिला त्रास देऊ लागला होता. त्यामुळे ती त्याला टाळत होती. ती कॉलेजला न जाता घरी राहत होती. मात्र, त्यानंतर सकाळच्या सुमारास पीडित तरूणी आंघोळ करत असताना आरोपी नवलने अचानक बाथरूमचा दरवाजा ढकलून आत डोकावले. त्याला अशा प्रकारे बघून ती घाबरली आणि जोराने ओरडली. त्यादरम्यान “प्लीज कॉल कर”, असे सांगून तो तेथून निघून गेला. ही बाब पीडित तरुणीने आरोपीच्या भावाला सांगितली आणि तिने वलगाव पोलिस ठाण्यात गेली तिथे महिला पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून आरोपी नवलविरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे.

 

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mini Truck / Chotta Hathi :  For More details call now : 9762041481

 


LET US BE YOUR SOCIAL MEDIA MANAGER-

We can keep your business connected by managing and updating your pages to help engage with your target audience and increase you public awareness of your business through proper management.

For More details WhatsApp on: 9420379055


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!