Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तुर्की आणि सीरियात, मृतांचा आकडा २० हजारांपर्यंत वाढण्याची डब्ल्यूएचओला भीती

Spread the love

सोमवारी तुर्की आणि सीरियामधील भूकंपामुळे आतापर्यंत ८००० लोकांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओने तुर्की आणि सीरियामध्ये मृतांचा आकडा २० हजारांपर्यंत वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच याचा फटका दोन्ही देशांतील २.३ कोटी लोकांना बसू शकतो, असेही जागतिक आरोग्य संघटनेने सांदीतले आहे.

सोमवारी पहाटे ०४:१७ वाजता तुर्कीमध्ये भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू गझियानटेपजवळ होता. हे सीरिया सीमेपासून ९० किमी अंतरावर आहे. अशा स्थितीत सीरियातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्केही जाणवले. तुर्की आतापर्यंत ५,८९४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ३४,८१० लोक जखमी झाले आहेत. तसेच, सीरियामध्ये १,२२० लोकांनी आपला जीव गमावला आहे. तुर्कीमध्ये भूकंपामुळे सुमारे ६००० इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सीरियातील ४०० इमारती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या, तर १२२० हून अधिक इमारतींचे नुकसान झाले आहे.

तुर्कीमध्ये बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे बचाव कार्यात मोठी अडचण येत आहे. तसेच खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे लँडिंग करणेही अशक्य आहे. अशा परिस्थितीत सर्व मदत रस्ते मार्गाने या भागांत पोहोचत आहे. तुर्की-सीरिया कॉरिडॉरही भूकंपामुळे उद्ध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत रस्त्याने सीरियापर्यंत मदत पोहोचवताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तुर्कीमध्ये तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. येथील सर्व शाळा १३ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या असून सर्व सरकारी इमारतींना शेल्टर होम बनवले आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रजब तय्यब एर्दुगन यांनी सांगितले की, आतापर्यंत ८४ देश आणि १४ आंतरराष्ट्रीय संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. केवळ तुर्कीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी ही मोठी आपत्ती असल्याचे ते म्हणाले आहे. तुर्कीमध्ये १०,००० कंटेनरमध्ये शेल्टर्स बनवण्याची तयारी सुरू आहे.

 

 

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mini Truck / Chotta Hathi :  For More details call now : 9762041481

 


LET US BE YOUR SOCIAL MEDIA MANAGER-

We can keep your business connected by managing and updating your pages to help engage with your target audience and increase you public awareness of your business through proper management.

For More details WhatsApp on: 9420379055


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!