Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ParliamentNewsUpdate : पंतप्रधानांच्या भाषणावर राहुल गांधी यांनी दिली ही प्रतिक्रिया …

Spread the love

नवी दिल्ली  : राहुल गांधी यांच्या भाषणानंतर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर कोणाचेही नाव न घेता जोरदार टीका केली. या वेळी विरोधी पक्षांनी गोंधळ घातला आणि अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशीची मागणी करत घोषणाबाजी केली. तर सत्ताधारी पक्षाच्या  ‘ मोदी , मोदी’च्या घोषणा  वाजवली. दरम्यान    मोदींच्या भाषणांनंतर  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना  राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान आपल्या मित्राला वाचवत आहेत.


सभागृहातून बाहेर पडल्यानंतर माध्यमंही बोलताना राहुल गांधी म्हणाले  की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकशी बाबत का बोलले नाहीत? बेनामी संपत्तीवर चर्चा का झाली नाही?” माझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरेही मिळाली नाहीत. अदानी पंतप्रधान मोदींचे मित्र नसते तर चौकशी झाली असती, असं ते म्हणाले आहेत. तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी मंगळवारी (7 फेब्रुवारी) मोदी सरकारमध्ये अदानींचा व्यवसाय प्रचंड वाढला आणि भाजपला त्याचा वैयक्तिक फायदा झाला, असा दावा केला होता. दोघांच्या जवळीकतेमुळेच हे घडल्याचे राहुल गांधी म्हणाले होते.

दरम्यान काल राहुल गांधी यांनी संसदेत दावा केला होता की, अदानींसाठी विमानतळ नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जर कोणी विमानतळ व्यवसायात नसेल तर ते विमानतळ कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकत नाहीत, हा नियम भाजपच्या केंद्र सरकारने अदानींसाठी बदलला. तसेच २०१४ नंतर अदानींच्या संपत्तीत वाढ झाल्याचेही त्यांनी म्हटले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!