Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

DhirendraShastriNewsUpdate : अखेर वादग्रस्त धीरेंद्र कृष्ण शास्त्री याला महाराष्ट्राने आणले वठणीवर….!!

Spread the love

भोपाळ  : आपल्या चमत्कारामुळे प्रसिद्ध झालेल्या मध्य प्रदेशातील छतरपूरमधील बागेश्वर धाम येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री याला अखेर महाराष्ट्रीयन संत तुकाराम प्रेमींनी वठणीवर आणले असून त्याने आपल्या कथित वक्तव्यावर माफी मागत आपले विधान मागे घेत हात जोडून माफी मागितली असल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रातील विवेकवादी विचारवंत श्याम मानव यांनी त्याला चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे.


बागेश्वर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धिरेंद्र शास्त्री महाराजाने काही  दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले  होते. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच यावर तीव्र पडसाद उमटले होते . महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायानेही या प्रकरणी माफीची मागण्याची मागणी केली होती. वाढता विरोध आणि नाराजी पाहता या बागेश्वर बाबाने आता आपले शब्द मागे घेतले आहेत. वक्तव्य मागे घेत असल्याचा त्याचा  एक व्हिडिओ समोर आला असून त्याने म्हटले आहे की , संत तुकाराम महाराज हे महान संत. ते माझे आदर्श आहेत. माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला गेला. यामुळे मी माझे शब्द मागे घेतो.

‘संत तुकाराम हे एक महान संत आहेत. ते माझे आदर्श आहेत. मी तुकारामांबद्दल एका पुस्तकात त्यांच्यासंबंधी एक गोष्ट वाचली होती. त्यांची पत्नी विचित्र स्वभावाची होती. तसेच ऊसाच्या टिपऱ्याचीही गोष्ट एका पुस्तकात वाचली होती. तुकारामांना त्यांची पत्नी ऊस आणायला पाठवते. पण ऊस आणल्यानंतर त्याच ऊसाने तुकारामांना त्यांची पत्नी मारते. त्यात उसाचे दोन तुकडे होतात. ही कहाणी मी आपल्या परिने भाविकांना सांगितली. पण आपल्या कहाणीमुळे वारकारी संप्रदायाच्या अनुयायांच्या आणि  ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांची मी हात जोडून माफी मागतो आणि माझे शब्द परत घेतो.”असे  धीरेंद्र शास्त्रीने म्हटले आहे.

काय होते वादग्रस्त विधान ?

‘संत तुकाराम हे महाराष्ट्रातील एक महात्मा. त्यांची पत्नी रोज त्यांना मारायची. रोज काठीने मारत होती. तुम्ही बायकोचा रोज मार खाता, लाज वाटत नाही? असा प्रश्न कुणीतरी तुकारामांना एकदा विचारला होता. ही तर परमेश्वराची कृपा आहे, मला मारणारी बायको मिळाली, असं उत्तर तुकारामांनी दिले  होते. यात कृपा कुठली? असे  तुकोबांना पुन्हा विचारण्यात आले. प्रेम करणारी बायको मिळाली असती तर देवाच्या प्रेमात पडलो नसतो, बायकोच्या मागे फिरत राहिलो असतो’, असे  तुकारामांनी सांगितल्याचे  बागेश्वर बाबा म्हणजे धीरेंद्र शास्त्री महाराजाने आपल्या प्रवचनात म्हटले  होतं. यामुळे हा बाबा वादात आला होता. 

दरम्यान  काही दिवसांपूर्वी त्याने शिर्डी साई बाबांबद्दलही  वादग्रस्त वक्तव्य केले  होते. सनातन धर्मियांकडे पूजा करण्यासाठी ३३ कोटी देत आहेत, तर मग चाँद मियाची पूजा करण्याची काय गरज आहे? असे  तो म्हणाला होता. यामुळे धीरेंद्र शास्त्री महाराजावर धार्मिक आणि जातीवाद पसरवण्याचाही आरोप करण्यात आला. तसे च त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एका व्यक्तीला अस्पृश्य म्हणत त्याने आपल्या पाया  पडण्यास नकार दिला होता. भगवान कृष्ण यादव होते. भगवान राम क्षत्रिय होते. पुराणकाळातही जाती व्यवस्था होती. पण जातीवाद नव्हता. राजकारण्यांनी जातीवाद पसरवला, असा आरोप धीरेंद्र शास्त्रीने केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!