Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दोन विमानांची हवेतच टक्कर, एक पायलट शहीद

Spread the love

शनिवार वायूदलासाठी खूप वाईट गेला. त्यांची दोन विमाने मध्य प्रदेशातील मुरैना येथे कोसळली. सकाळी या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेरहून उड्डाण केले होते. मुरेना जिल्ह्याजवळ सुखोई-३० आणि मिराज २००० विमाने कोसळली या अपघातात दोन पायलट सुरक्षित असून एक पायलट शहीद झाला आहे. याशिवाय राराजस्थान भरतपूरमध्येही विमान कोसळल्याची माहिती मिळाली असून विमानाचे काही भाग सापडले आहेत.

हवाई दलाचे म्हणणे आहे कि, हा अपघात कसा झाला हे कोर्ट ऑफ इन्क्वायरीतून स्पष्ट होईल. मात्र आता मुरैनाच्या आकाशात दोन लढाऊ विमाने टक्कर झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. ही विमाने नियमित प्रशिक्षण मोहिमेवर होती. या दोन्ही विमानांमध्ये तीन पायलट होते, त्यापैकी एका पायलटला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात नेमका कसा झाला यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी मुरैनाच्या एसपींनी सांगितले की, दोन जेट विमाने सापडली असून त्यात एक सुखोई आणि दुसरे मिराज होते. या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेरहून उड्डाण केले होते. हवाई दलाकडून मिळालेल्या माहितीमध्ये एका विमानात दोन पायलट आणि एका विमानात एक पायलट असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, दोन पायलट सुरक्षित सापडले पण एका पायलटचे काही अवयव सापडले आहेत.

याशिवाय राजस्थानमधील भरतपूरचे डीएसपी अजय शर्मा यांनी सांगितले की, आम्हाला सकाळी १० ते १०.१५ च्या सुमारास विमान अपघाताची माहिती मिळाली. घटनास्थळी आल्यानंतर हे हवाई दलाचे लढाऊ विमान असल्याचे आढळून आले. मात्र, अवशेष पाहून ते कोणत्या लढाऊ विमानाचे आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच आतापर्यंत त्याच्या पायलटबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. पायलटने विमान इजेक्ट केले असावे, असे बोलले जात आहे. वायुसेनेचे पथक भरतपूरला पोहोचले असून अधिक तपस सुरु आहे.

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!