Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : देशातील 412 वीर जवानांना शौर्य पुरस्कार घोषित, मेजर शुभांग यांना कीर्ती चक्र

Spread the love

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (२५ जानेवारी) शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सशस्त्र दलातील जवानांना आणि इतरांना 412 शौर्य पुरस्कार आणि इतर संरक्षण सन्मान मंजूर केले आहेत. यामध्ये चार मरणोत्तरासह सहा कीर्ती चक्रे, दोन मरणोत्तरासह 15 शौर्य चक्रांचा समावेश आहे.

डोग्रा रेजिमेंटचे मेजर शुभांग यांना जम्मू आणि काश्मीरच्या बडगाममधील ऑपरेशनमध्ये त्यांच्या शौर्य भूमिकेसाठी कीर्ती चक्र, द्वितीय सर्वोच्च शौर्य पदक प्रदान करण्यात आले. ऑपरेशन दरम्यान त्यांनी एका दहशतवाद्याला ठार केले आणि जखमी जवानांना वाचवले. चिनार कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंग औजाला यांना उत्तम युद्ध सेवा पदक (UYSM) प्रदान करण्यात आले आहे. 3 कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल आरके तिवारी आणि 14 कॉर्प्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए सेनगुप्ता यांना देखील UYSM प्रदान करण्यात आले. आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलचे ब्रिगेडियर संजय मिश्रा यांना अति विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!