Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद : सीआयडी कर्मचाऱ्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत केली आत्महत्या

Spread the love

औरंगाबाद येथे सीआयडीमध्ये (गुन्हे अन्वेषण विभाग) कार्यरत असलेल्या ४२ वर्षीय कर्मचाऱ्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजलेले नाही. अनिल सोनवणे (४२, रा. एन -६ सिडको, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे

अनिल सोनवणे हे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग औरंगाबाद येथे शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांची नेमणूक अनुकंपावर वडिलांच्या जागी सन २०१८ मध्ये झाली होती. सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने धावत्या रल्वेसमोर आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह घाटी रुग्णालयात आणला. तेथे तपासणी केली असता हा मृतदेह सी.आय.डी. विभागात कार्यरत असलेल्या सोनवणे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनेबाबत नातेवाईकांना माहिती देत बोलावून घेतले. पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार, सोनवणे यांच्यावर कर्ज होते आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासला सुरुवात केली आहे.

 

ShivsenaNewsUpdate : चोरलेल्या मुर्तीचे कुणी मंदिर उभारत नाही, संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!