Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र; पत्रकार परिषदेत केली युतीची घोषणा

Spread the love

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली आहे. मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेला व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत तर वंचित बहुजन आघाडीकडून रेखाताई ठाकूर, अबुल खान उपस्थित होते.

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त आज या युतीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे महाले कि, प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पुढची वाटचाल एकत्र घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा हे स्नेही होते. दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि जीवाला जीव देणारे सहकारी एकत्र येऊन ‘देश प्रथम’ याचा विचार करुन पुढे जाणार आहोत. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याच्याबद्दल आम्ही नंतर वेळेनुसार निर्णय घेऊ. आम्हाला जेव्हा वाटले फसवणुकीचे राजकारण होत आहे तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससोबत गेलो आणि मविआ सरकार यशस्वीपणे चालवले. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा झाली, तुम्हाला सोबत घ्यायला कोणाची ना नाही. त्यामुळे आमचे असे ठरले की काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी आपल्या मित्रपक्षाला आणायचे आणि मित्रपक्षांसोबत हित सांभाळायचे असे हि उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

निवडणुकीतील जागा वाटपाच्या प्रश्नावर विचारला असतांना उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले कि, अजून कोणी कुठल्या जागा लढवायच्या ही वेळ आलेली नाही, वेळ आल्यावर जागा लढवायचा निर्णय होईल. तसेच हिंमत असेल तर लवकरात लवकर निवडणुका घ्या, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, निवडणुकीमध्ये एक बदल्याचे राजकारण सुरु होईल. आम्ही जी चळवळ सुरु केली. त्याला आमच्याच मित्र पक्षांनी गिळंकृत करण्याचा किंवा छोटा करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना बाजूला करुन चळवळ सुरु ठेवली. भांडवलशाही, लुटारुंची सत्ता सुरु झाली आहे. दाओसला जाऊन उद्योग येतात हे मी कधी पाहिले नाही, फक्त करार होतात. आज ईडीच्या मार्फत पॉलिटिकल लीडरशिपवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. नरेंद्र मोदी यांचा सुद्धा एक दिवस अंत पक्षात होणार आहे, त्यांनी त्यांच्या पक्षातील लीडरशिप संपवली आहे. फक्त फाईली उचलून घेऊन जायचे आमचे काम आहे, असे त्यांच्यातले अनेक मंत्री म्हणतात. प्रादेशिक पक्षांचा लीडरशिप तयार करण्याचा प्रयत्न असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेल. शरद पवार यांची प्रतिक्रिया वाचली. ते आमच्यासोबत येतील अशी आशा मी बाळगतो. आमची भांडणं जुनी आहे, शेतातली नाही. आता फक्त आम्ही दोघेच एकत्र आलो आहोत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा आमच्यासोबत एकत्र येतील असे देखील प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!