Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : मॉक ड्रिलमध्ये पोलिसांकडून ‘अल्ला हु अकबर’चा नारा दिल्यामुळे मुस्लिम समाज संतप्त …

Spread the love

औरंगाबाद : महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील मंदिरात पोलिसांनी केलेल्या ‘मॉक ड्रिल’मुळे मुस्लिम समाज संतप्त झाला आहे. या प्रकरणी मुस्लिम नेत्यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, मॉक ड्रिलचा उद्देश एका विशिष्ट समुदायाच्या भावना भडकावण्यासाठी होता, ज्यामध्ये दहशतवाद्यांचा एक गट मुस्लिम म्हणून दाखवण्यात आला होता.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार तक्रारदार मुस्लिम नेत्यांचे म्हणणे आहे की, चंद्रपुरातील पोलिसांच्या मॉक ड्रीलवर त्यांचा आक्षेप आहे. ज्यामध्ये पोलिसांना दहशतवाद्यांना कसे नियंत्रणात आणायचे हे दाखवायचे होते, पण त्यादरम्यान पोलिसांचा मुस्लिम द्वेष बाहेर आला.

मुस्लिम नेत्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील महाकाली मंदिरात आयोजित ‘दहशतवादविरोधी मॉक ड्रिल’मध्ये, दहशतवादी म्हणून उभे असलेले पोलिस एका विशिष्ट समुदायाशी संबंधित घोषणा देताना दिसले. या कवायतीत दहशतवाद्यांच्या एका गटाने प्रार्थनास्थळावर ताबा मिळवला आणि भाविकांना ओलीस ठेवले. त्यांनी ‘अल्ला हु अकबर’चा नाराही दिला.

वकीलांचेही निवेदन …

याप्रकरणी वकिलांच्या गटाने जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. त्याचवेळी पोलीस अधीक्षक (एसपी) रवींद्र सिंग परदेशी यांचे वक्तव्य रविवारी आले. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील प्रसिद्ध महाकाली मंदिरात ११ जानेवारी रोजी स्थानिक पोलिस, दहशतवाद विरोधी पथक, विशेष युनिट C-60 आणि इतर दलाच्या जवानांनी ‘मॉक ड्रिल’ आयोजित केली होती. पोलिसांचे ते ‘मॉक ड्रिल’ वादात सापडले आहे कारण स्वत:ला दहशतवादी म्हणवून घेणारे पोलिस एका विशिष्ट समुदायाशी संबंधित घोषणा देत होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!