Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनकला सीटबेल्ट न लावल्याने ठोठावण्यात आला दंड

Spread the love

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना सीटबेल्ट न लावल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. कार चालवतांना सीटबेल्ट न लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्याने सुनक यांना पोलिसांनी दंड ठोठावण्यात आला असल्याचे लँकेशायर पोलिसांनी सांगितले आहे. तसेच पोलिस अधिकाऱ्याने सांगितल्या नुसार त्यांनी आपली चूक पूर्णपणे मान्य केली आहे. दरम्यान त्यांनी माफी मागितली असून दंड देखील भरणार आहेत.

पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कर चालवतांना एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. कार चालवतांना सीटबेल्ट न लावल्यामुळे त्यांना दंडाची नोटीस देण्यात अली. सत्तेत आल्यापासून सुनक यांना दंडाची नोटीस मिळाल्याची ही दुसरी वेळ आहे. या पूर्वी २०२० मध्ये तत्कालीन पंतप्रधानांच्या वाढदिवसात जातअसतांना कोविड लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याने बोरिस जॉन्सन आणि पत्नी कॅरीसह ऋषी सुनक यांना दंड ठोठावण्यात आला होता.

कायद्याचे विलंघन करण्यासाठी दंडाची नोटीस पाठवणे आणि २८ दिवसांच्या आत दंड भरणे बंधनकारक आहे. जर कोणाला दंडाला विरोध करायचा असेल, तर पोलिस या प्रकरणाचा आढावा घेऊन दंड मागे घ्यायचा की न्यायालयात न्यायचा याचा निर्णय घेतात. सीट बेल्ट न लावणाऱ्या प्रवाशांना १०० पौंडांपर्यंत दंड होऊ शकतो. यासोबतच हे प्रकरण न्यायालयात गेल्यास ५०० पौंडांपर्यंत वाढ होऊ शकते. दरम्यान, या प्रकरणावरून विरोधी पक्षा लेबर पार्टीने ऋषी सुनक यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले कि, पक्षाच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, ऋषी यांना या देशात सीट बेल्ट, डेबिट कार्ड, ट्रेन सेवा आणि अर्थव्यवस्था कशी सांभाळावी हे माहित नाही.

 

Live updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, ३८ हजार ८०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

 

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!