Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत जोडो यात्रा ज्याभागात सुरू, त्या भागात २ बॉम्बस्फोट – ९ जण जखमी

Spread the love

जम्मू-काश्मीरमधील नरवाल येथे शनिवारी (२१ जानेवारीला) दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. या बॉम्बस्फोटात नऊ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर उपचार सुरु असून आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ या केंद्रशासित प्रदेशात सुरु असतानाच हे स्फोट झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी जम्मूमधील नरवाल औद्योगिक परिसरात दोन बॉम्बस्फोट झाले. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नऊ जण जखमी झाले आहेत, सर्वांवर उपचार सुरु असून आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. आर्मी आणि सिक्युरिटी इम्पॅक्ट अॅनालिसिस (SIS) टीमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. यापूर्वी जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) मुकेश सिंह यांनी जम्मूच्या नरवाल भागात दोन बॉम्बस्फोट झाल्याचे स्पष्ट केले होती.

घटनास्थळी उपस्थित असलेले डीआयजी जम्मू, शक्ती पाठक म्हणाले कि, आमच्याकडे दोन स्फोटांची माहिती आहे आणि आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. पुढे जे काही उघड होईल ते सामायिक केले जाईल. दरम्यान, परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 

अंदोलनामागे वैयक्तिक अजेंडा… भारतीय कुस्ती महासंघाने सर्व आरोप फेटाळले

 

#JammuKashmir #India #Mahanayak #MahanayakOnline #MahanayakNews #NewsUpdate #Currentnewsupdate


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!