कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विश्वास नांगरे पाटील सह इतर पोलिस अधिकाऱ्याची चौकशी

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील सुवेझ हक आणि डॉ.शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. २१ ते २५ जानेवारीदरम्यान त्या दिवशी नेमके काय घडले होते, पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.
२१ ते २५ जानेवारी दरम्यान सह्याद्री अतिथीगृह इथे या सगळ्यांची चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी विश्वास नांगरे पाटील (यांची चौकशी २४ ते २५ जानेवारी) हे कोल्हापूर परिपरिक्षेत्राचे महानिरीक्षक होते तर सुवेझ हक (यांची चौकशी २४ ते २५ जानेवारी) हे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते. याशिवाय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ शिवाजी पवार (यांची चौकशी २१ ते २३ जानेवारी) हे या प्रकरणात तपास अधिकारी होते. या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी हर्षाली पोतदार हिची देखील आयोगासमोर चौकशी होणार आहे. हर्षाली पोतदारची २१ ते २२ जानेवारी, दरम्यान चौकसी होणार आहे.
२०१८मध्ये कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग नेमला आहे. मागील दोन वर्षांपासून या आयोगासमोर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. याआधी अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तसेच या प्रकरणी आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही समन्स बजावले होते. आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह आरोपी हर्षाली पोतदार हिची देखील आयोगासमोर चौकशी होणार आहे.
#Maharashtra #Maharashtrapolitics #MahanayakOnline #MahanayakNews #NewsUpdate #CurrentNews #Bhimakoregaon #VishvasNagrePatil
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055