Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपा नेत्यांना, पंतप्रधानांचा मुस्लिम समाजाबाबत विचारपूर्वक विधान करण्याचा सल्ला

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नेत्यांना संबोधित केले. पंतप्रधानांनी भाजपा नेत्यांना मुस्लिम समाजाबाबत विचारपूर्वक विधान करण्याचा सल्ला दिला आहे. मुस्लिम समाजाबाबत चुकीची विधाने अजिबात करू नका. विविध ठिकाणी जाऊन लोकांना भेटा. भारताच्या राजकीय इतिहासाला जवळून पाहिलेले नाही त्यांना जागरुक करणे म्हत्वाचे आहे. आपल्याला आता धरती बचाओ अभियान चालववे लागणार असल्याचे मोदी यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा नेत्यांना देशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही तयारी करण्यास सांगितले. संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या तयारीला लागा. मेहनतीच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडता कामा नये. भाजपा आता फक्त राजकीय आंदोलन नव्हे, तर सामाजिक आंदोलनात बदलले गेले पाहिजे. आता सामाजिक पातळीवर आपली भूमिका खूप महत्वाची असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच सीमेलगतच्या गावांमध्ये संघटन आणखी मजबूत केले पाहिजे. निवडणुकीला अजूनही ४०० दिवस बाकी आहेत आणि आपल्याला पूर्ण ताकदीने प्रयत्न सुरू करायला हवेत असेहि त्यांनी यावेळी सांगितले.

१८ ते २५ वयोगटातील युवांना भारताच्या राजकीय इतिहासाला जवळून पाहिलेले नाही. याआधीच्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चुकीच्या कामांची माहिती त्यांना नाही. यासाठी आपण त्यांना जागरुक करणे आणि भाजपाच्या सुशासनाची माहिती देणे गरजेचे आहे. ज्यापद्धतीने आपण बेटी बचाओ अभियान यशस्वी केले त्याचपद्धतीने आपल्याला आता धरती बचाओ अभियान चालववे लागणार असल्याचेहि मोदी यांनी यावेळी सांगितले.

 

दावोस मध्ये पहिल्याच दिवशी राज्यात सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक

 


#PMNarendraModi #NarendraModi #MahanayakOnline #MahanayakNews #NewsUpdate #CurrentNews

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!